तेलंगणा सरकारकडून गौरव
सहावे ऑल इंडिया कला स्पर्धा प्रदर्शनात कलाकृतीची दखल
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील चित्रकार नुरील प्रभात भोसले यांना सहावे ऑल इंडिया कला स्पर्धा प्रदर्शनात तृतीय क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. युवा विकास पर्यटन व संस्कृती विभाग तेलंगणा सरकारच्या वतीने या कला स्पर्धा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

हैदराबाद येथील स्टेट गॅलरी ऑफ आर्ट येथे कला स्पर्धा प्रदर्शन पार पडले. यामध्ये भारतभरातून एकूण 2 हजार कलाकारांच्या कलाकृतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 150 कलाकृती प्रदर्शनासाठी निवडण्यात आल्या. त्यातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक राहुरी तालुक्यातील चित्रकार नुरील भोसले यांच्या अरुंधती या व्यक्तीची चित्रास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हे चित्र कागदावरती जलरंग या माध्यमातून रंगविले असून, त्याचा आकार 24 बाय 32 इंच आहे.
पर्यटन, संस्कृती व हेरिटेज विभाग (तेलंगणा सरकार) विशेष सचिव जयेश रंजन यांच्या हस्ते भोसले यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. भोसले यांना यापूर्वी देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त झाले आहेत. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या हैदराबादच्या पारितोषिकमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.