• Fri. Aug 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

मुकुंदनगरच्या सहारा सिटीतील ‘नूर लॉन्स’ला मनपाचा दणका

ByMirror

Aug 20, 2026
मुकुंदनगरच्या सहारा सिटीतील ‘नूर लॉन्स’ला मनपाचा दणका

कन्व्हेन्शनल सेंटरची परवानगी; मात्र अनधिकृतपणे लॉन्सचा वापर केल्याचा आरोप


रहिवाशांच्या तक्रारींची दखल; अमेनिटी प्लॉटवर ‘नूर लॉन्स’ सुरू ठेवल्यास कारवाईचा इशारा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीतील सहारा सिटी परिसरातील सर्वे नं. 333/1/2 व 334/1/2 येथे महानगरपालिकेची परवानगी कन्व्हेन्शनल सेंटर म्हणून घेण्यात आली असल्याचे समोर आले आहे. मात्र, या जागेचा अनधिकृतपणे ‘नूर लॉन्स’ म्हणून वापर केला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.


सहारा सिटी हा रहिवासी परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विवाह सोहळ्यांमुळे वाहतूक कोंडी, वाहनांची गर्दी, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपक, पार्किंगची समस्या तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबाबत रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रहिवासी परिसरातील नियोजित वापराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्यावर प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित नूर मोहम्मद आबीद शेख यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. संबंधित जागेचा ‘नूर लॉन्स’ म्हणून वापर करू नये, असे महानगरपालिकेने बजावले आहे. तसेच संबंधित अमेनिटी प्लॉटवर ‘नूर लॉन्स’ म्हणून वापर सुरू ठेवल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. महानगरपालिकेने रहिवासी भागात मोठ्या कार्यक्रमांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रशासनाने भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *