अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एजाज शेख यांना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकराव टेमकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी वर्षभर शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिले जाते. तर शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहे. या कार्याची दखल घेऊन रोटरीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक विद्यालयास सन्मानित करण्यात आले.
शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शाहीद काझी, सचिव श्री रेहान काझी सर, संचालिका डॉ. अस्मा काझी यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व ग़ुणवत्ता वाढीसाठी समिउल्ला शेख, एजाज शेख, पठाण सर, तबस्सुम मॅडम, हवालदार मॅडम, हिना शेख, तनाज शेख, चौधरी सर, निलोफर शेख आदी योगदान देत आहे.