प्रयत्नांची पराकाष्टा करुनही रुग्णाची प्राणज्योत मालवली
नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.1 एप्रिल) सकाळी 7 वाजता ह्रद्यविकाराचा झटका आलेल्या शहरातील विलास ससे यांना वाचविण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य धावले. सकाळी तातडीने रुग्णवाहिका बोलावून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मात्र दुर्देवाने ह्रद्यविकाराचा छटका अत्यंत तीव्र असल्याने सर्व सदस्यांच्या प्रयत्नांना अपयश येऊन ससे यांची प्राणज्योत मालवली. ग्रुपच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहून सर्व सदस्य ससे परिवाराच्या दु:खात सहभागी झाले होते.
दररोज पहाटे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य योगा-प्राणायामासाठी भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क मध्ये उपस्थित असतात. सकाळी 7 वाजता जॉगिंग पार्क जवळील रोकडेश्वर हनुमान मंदिरात कोणी तरी व्यक्ती चक्कर येऊन पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यांच्या मदतीसाठी सर्व सदस्य धावून गेले. ग्रुप मधील डॉक्टर असलेल्या सदस्यांना सदर व्यक्तीला ह्रद्यविकाराचा झटका आल्याचे लक्षात आले. सदस्यांनी तातडीने संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली. तर शहरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करुन रुग्णाला घेऊन येत असल्याची माहिती दिली. अनोळखी व्यक्तीच्या जीवासाठी ग्रुपचे सदस्य देवदूतप्रमाणे धावून गेले. शेवटी हॉस्पिटल गाठले, मात्र ह्रद्यविकाराचा झटका तीव्र असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ग्रुपच्या सदस्यांनी हातमपूरा येथील मयत झालेल्या व्यक्तीची माहिती काढून त्यांच्या कुटुंबीयांना कळविले. ग्रुपच्या वतीने भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यासमोर विलास ससे यांना श्रध्दांजली वाहिली. तर नालेगाव अमरधाममध्ये झालेल्या त्यांच्या अंत्यविधीला ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी हरदिनच्या वतीने श्रध्दांजली वाहून त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी डॉ. अशोक चेंगडे, डॉ. रवी दुवा, रमेश वराडे, सचिन चोपडा, सुधीर कपाळे, दिलीप ठोकळ, सर्वेश सपकाळ, कैलास रासकर, सुरेश फुलसौंदर, राजू भिंगारे, मनोज मेहेर, ब्रिजभूषण मालू, मधुकर खताळ, शिवकुमार पांचारिया, जालिंदर बोरुडे, देवरतन झंवर, जालिंदर अळकुटे, रामभाऊ झिंजे, अभिजीत सपकाळ, अविनाश जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, विलास आहेर, शंकरराव पंगुडवाले, विकास भिंगारदिवे, अविनाश पोतदार, सरदारसिंग परदेशी, मनोज पंगुडवाले, दिपकराव घोडके, मुन्ना वाघस्कर, नवनाथ वेताळ, सुंदरराव पाटील, रतन मेहेत्रे, किरण फुलारी, चुनीलाल झंवर, अजय खंडागळे, विकास निमसे, महेश सरोदे, योगेश चौधरी, किशोर भगवाने, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, दीपक अमृत, मिलिंद क्षीरसागर, माधव भांबुरकर, अशोक भगवाने, दीपक बोंदर्डे, अतुल वराडे, धनेश पंधारे आदी उपस्थित होते.