माता रमाईची निष्ठा, त्याग व समर्पणाच्या कार्याला सलाम
महिलांना सन्मानार्थ साड्यांची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची जयंती महिलांचा सन्मान करुन साजरी करण्यात आली. टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांच्या पाठिशी उभे राहताना माता रमाईची निष्ठा, त्याग व समर्पणाच्या कार्याला सलाम करण्यात आला. तर त्यांच्या सन्मानार्थ महिलांना साड्यांची भेट देण्यात आली.
प्रारंभी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संध्याताई मेढे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, आरती बडेकर, मायाताई जाधव, सरिता गागुंर्डे, मंदाकिनी बडेकर, मनिषा कांबळे, सुनिता जगताप, निर्गुणा कांबळे, सुनिता घोडके, अनुसया बडेकर, संजवनी बडेकर, उर्मीला यादव, मिरा देठे, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, ॲड. संतोष गायकवाड, रोहित आव्हाड, प्रा. विलास साठे, शिवाजी भोसले, अशोक बागुल, विजितकुमार ठोंबे, बाळासाहेब कांबळे, आण्णा गायकवाड, प्रफुल्ल सुर्यवंशी, सिध्दांत कांबळे, श्रीकांत देठे, अमन सुर्यवंशी, जीवन कांबळे, अविनाश बडेकर, हर्षल कांबळे, विवेक भिंगारदिवे, अरविंद जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुनिल जाधव, हर्षल कांबळे आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. सिताताई भिंगारदिवे म्हणाल्या की, रमाईंनी आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. आंबेडकरी अनुयायींसाठी बाबासाहेबांइतक्याच रमाई देखील आदरस्थानी आहेत. त्यांनी दिलेला त्याग न विसरता येणारा आहे. स्वतः झिजून सर्वांना मायेची सावली मिळण्यासाठी त्यांना हालअपेष्टा सहन केल्या. बाबासाहेबांच्या मागे रमाई खंबीर उभ्या राहिल्याने दीन-दलितांच्या उध्दाराचा लढा यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. तर बाबासाहेबांचा कुंकू लावते कपाळी हाच दागिना… या कवितेतून रमाईची थोरवी स्पष्ट केली.
संध्या मेढे यांनी आजच्या महिलांनी माता रमाई यांचा आदर्श समोर ठेवावा. समाजात पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावताना त्यांना बळ देण्याचेही काम महिलांना करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय कांबळे यांनी कवितेमधून त्यागमुर्ती रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
