अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर मराठा वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटीलबा निमसे यांचे बुधवारी (दि.27 डिसेंबर) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी, सुना, पुतणे, पुतण्या व नातवंड असा परिवार आहे.
त्यांचे मूळ गाव मांडवे असून सध्या ते शहरातील बागरोजा हडको दिल्ली गेट येथे स्थायिक होते. अतिशय प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे असल्याने सर्वांना सुपरिचित होते. परिसरात ते निमसे पाटील या नावाने प्रचलित होते. त्यांना सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याची ओढ होती. नगर मराठा वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षात त्यांनी मराठा समाजातील हजारो मुला-मुलींचे लग्न जमवले.