भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस; सोन्याची नथ व पैठणी साडी जिंकण्याची संधी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सव ते दिवाळी दसऱ्या पर्यंत सुवर्ण खरेदीचे आनंद द्विगुणित करण्यासाठी दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीने सोने-चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली आहे. पहिल्या भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस ठेवण्यात आले असून, तसेच महिलांना सोन्याची नथ व पैठणी साडी देखील जिंकता येणार असल्याची माहिती संचालक नवनाथभाऊ दहिवाळ व नितीन दहिवाळ यांनी दिली.
पाच हजार रुपये पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे. या कुपनचे सोडत पध्दतीने भाग्यवान विजेत्यांची बक्षिसांसाठी निवड केली जाणार आहे. पहिले बक्षीस टू व्हीलर, दुसरे बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरे बक्षीस पैठणी साडी भाग्यवान विजेत्यांना देण्यात येणार आहे.
दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नवनागापूर (रेणुका स्कूल जवळ), पाईपलाईन रोड (यशोदा नगर कमानी समोर), खरवंडी (ता. पाथर्डी) व धनकवडी (जि. पुणे) येथे चार शाखा कार्यरत आहे. या चारही शाखेमध्ये सदर ऑफर ठेवण्यात आली आहे. 47 वर्षापासून सराफ व्यवसायात कार्यरत असलेल्या दहिवाळ सराफच्या वतीने दरवर्षी विविध सण-उत्सव काळात खरेदीवर विविध ऑफर ठेवण्यात येते. तसेच इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारचे आकर्षक डिजाईनचे सोन्याचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, कास्टिंग ज्वेलरी, सर्व स्टोन ज्वेलरी, राशीचे खडे, हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. दागिन्यांच्या घडणवळणीवर सर्वात कमी मजुरी असलेले हे दालन असून, सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत. 1978 पासून शाखा कार्यरत असून, ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यात आला असल्याचे दहिवाळ बंधूंनी सांगितले आहे. तर ग्राहकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.