• Sat. Nov 22nd, 2025

कै. डॉ. केदारनाथ चांडक स्मृती पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

ByMirror

Nov 16, 2025

आरोग्य भारती संघटनेचा उपक्रम


आरोग्य हा व्यवसाय नव्हे, सेवा आहे -अशोक वार्ष्णेय

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रुग्णसेवेचा अखंड ध्यास घेत आयुष्य समर्पित करणारे कै. डॉ. केदारनाथ चांडक (सोनई) यांच्या स्मरणार्थ आरोग्य भारती संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. समाजाचे मंगल साधण्यासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्याचा उद्देश या सोहळ्याच्या माध्यमातून साधण्यात आला.
समाजाच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी व्यक्तीपासून समष्टीपर्यंत विचार करणाऱ्या आरोग्य भारतीने हा उपक्रम आयोजित केला गेला होता. या सोहळ्याला शहरातील सामाजिक, वैद्यकीय, अध्यात्मिक आणि सेवा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


या कार्यक्रमाला आरोग्य भारतीचे अखिल भारतीय संघटन सचिव अशोक वार्ष्णेय, महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, तसेच डॉ. संतोष गटने, दादासाहेब ढवाण,सोमनाथ दिघे, डॉ. किशोर पुरकर, डॉ. अजित फुंदे, डॉ. जयदीप देशमुख, डॉ. संतोष गटने,श्रीपाद शिंदीकर, कैलास चोथे, संदीप भोर, राजेश परदेशी, योगेश सेतवाल, कौस्तुभ पुरकर, डॉ. मधुकर भोर, प्रकाश गोसावी, श्रीमती अयोध्या चांडक, प्रणव चांडक, पौर्णिमा पुरकर, ऋतुजा पुरकर, सौ वैशाली चोथे, निलम परदेशी, भगवान कुलकर्णी, स्मिता बेला पूरकर,अमेय वाघ,चांडक परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अशोक वार्ष्णेय यांनी बोलताना आज वैद्यकीय क्षेत्र व्यवसायमूलक होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रुग्ण उपचारानंतरही रुग्ण मानसिक तणावात आणि डिप्रेशनमध्ये जात असल्याची गंभीर बाब त्यांनी मांडली. बीपी, शुगर यांसारखे आजार मोठ्या शहरांत स्टेटस सिम्बॉल बनले असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी नैसर्गिक औषधी वनस्पती, परिश्रमप्रधान जीवनशैली, ऋतूनुसार आहार आणि सामूहिक भावनेमुळे आजार कमी लागत असतयाचा आज अभाव आहे. या बदलत्या परिस्थितीत आरोग्य भारती समग्र आरोग्य, जीवनशैली सुधारणा आणि समाजआरोग्य या दिशेने मोठे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य हा केवळ उपचारांचा विषय नाही, तर सेवेचा विषय असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी पुरस्कार प्राप्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.


शेखर मुंदडा यांनी कै. डॉ. केदारनाथ चांडक यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सांगितले की, डॉ. चांडक हे अतिशय साधे, सेवाभावी आणि उच्च विचारांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर सेवेला प्राधान्य दिले; त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे रोजच्या 120 सूर्यनमस्कारांची शिस्त व अंगीकारलेली स्वच्छ जीवनशैली. मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. मोबाईल, टीव्ही, डिजिटल व्यसनांमुळे लोक मानसिक तणावाच्या गर्तेत जात असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य भारती “आरोग्य विचारांचे संवर्धन, फूड हॅबिट सुधारणा आणि मानसिक स्वास्थ्य” या क्षेत्रांत मोलाचे योगदान देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *