• Wed. Oct 29th, 2025

जालिंदर बोरुडे यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्काराने गौरव

ByMirror

May 8, 2024

निस्वार्थ भावनेने आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना मोफत शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी देण्याचे काम करणारे फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.


गोंडेगाव (ता. नेवासा) येथे तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ समाजसेवक कॉ. बाबा आरगडे यांच्या हस्ते बोरुडे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुनिल गोसावी, प्राचार्य बी.पी. ढाकणे, निवृत्त पोलीस अधिकारी तथा कवी सुभाष सोनवणे, डॉ. अशोकराव ढगे, कवी भारत गाडेकर, प्राचार्य किशोर धनवटे, डॉ. अशोक ढगे, जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे आदी उपस्थित होते.


जालिंदर बोरुडे फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 31 वर्षापासून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या असून, या सेवेच्या माध्यमातून अनेकांना नवदृष्टी मिळाली आहे. तर नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करुन अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान घडवून आनले आहे. नेत्र शिबिराबरोबरच समाजाची गरज ओळखून विविध आरोग्य शिबिर फाऊंडेशनच्या माध्यमातून ते घेत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे, सुनिल गोसावी, कवी सुभाष सोनवणे व प्राचार्य ढाकणे यांनी आपल्या मनोगतामध्ये फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून बोरुडे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *