पावसाने खराब झालेले खड्डेमय रस्ते झाले चकाचक
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने कोर्ट परिसर व टांगे गल्ली येथे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीतून तर नगरसेवक नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या पाठपुराव्याने रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले. नुकतेच या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर व मनोज लोंढे यांच्या हस्ते झाले. रस्त्याच्या डांबरीकरणानंतर पावसाने खराब झालेले खड्डेमय रस्ते चकाचक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभाप्रसंगी आप्पा येवले, श्रीकांत दसरे, अमोल वाळके, यशवंत येवले, संग्राम नवले, पंडित भंडारी, सुभाष गुगळे, गणेश सोनवणे, शुभम दसरे, अजय भुजबळ,नरेश बुरा, श्रीकांत गोणे, सुनील बुरा, ऋषिकेश कुरापट्टी, अमोल बुरगुल, स्वप्नील ठोसर, नाना कोटा, गौरव बुरगुल, यश येमूल, प्रथमेश बत्तीन, उमेश चेन्नूर, नेहल बिंगी, कृष्णा कोक्कुल, वेदांत वाळके, हर्षल न्यालपेल्ली, यश शहरकर, भूषण बोरुडे, यश राठोड आदी उपस्थित होते.

संदीप भांबरकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक 13 मध्ये पै. सुभाष लोंढे यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांनी विकास कामे केली. प्रभाग समस्यामुक्त करण्यासाठी त्यांचे कार्य सुरु असून, विविध विकास कामांसह प्रलंबीत प्रश्न सोडविण्यात ते योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज लोंढे यांनी नागरिकांना सोयी-सुविधा देण्याचा विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन प्रभागात विकास कामे सुरु आहेत. शहरातील महत्त्वाचा भाग असलेल्या जुने कोर्ट परिसरातील रस्ते खासदार विखे यांच्या माध्यमातून तर नगरसेवक लोंढे यांच्या प्रयत्नाने खड्डेमुक्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांचा प्रलंबीत प्रश्न सोडविल्याबद्दल नागरिकांनी यावेळी आभार मानले.