सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील उद्योगगुरू रविराज भालेराव यांना प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते एमएसएमई बेस्ट बिझनेस पर्सनालिटी भारत बिझनेस अवॉर्ड 2023 प्रदान करण्यात आला. सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना उद्योग व व्यवसाय क्षेत्रात उभे करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे भालेराव यांच्या कार्याची दखल घेऊन मुबई येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी एमएसएमईच्या प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण भारतातून प्रत्येक राज्यातून तीनच व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यापैकी भालेराव हे एक आहेत. रविराज भालेराव युवकांमधून उद्योजक घडविण्यासाठी कार्य करत आहे. उत्कृष्ठ शार्प इंजिनीअरिंग वर्क्स, शार्प बीजनेस कन्सल्टन्सी व एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिटयूटच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायिक प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
