• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

रामचंद्र खुंट येथील गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ॲक्सेसरीज दालनाचा शुभारंभ

ByMirror

Oct 31, 2023

सिमला उद्योग समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करून अनेक युवकांना रोजगार दिला -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामचंद्र खुंट येथे सिमला उद्योग समुहाच्या गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ऑल मोबाईल ॲक्सेसरीज दालनाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, उद्योजक पै. अफजल शेख, नगरसेवक नज्जू पैलवान, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद (भा) कुरेशी, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, जुनेद शेख, नवेद शेख, जावेद शेख, शाहिद शेख, अजीम शेख, मुफ्ती अल्ताफ, शेख नासिर अब्दुल्ला, दादूभाई सुभेदार, उबेद शेख, नईम सरदार, ॲड. मुज्जू शेख आदी उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सिमला उद्योग समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करून अनेक युवकांना रोजगार देण्यासह नगरकरांना सेवा उपलब्ध करुन दिली. गोल्डन नावाने त्यांनी विविध फर्म सुरु केले असून, मोबाईल शॉपीच्या माध्यमातून शहरातील विविध भागात शाखा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. उद्योग, व्यवसायातून युवकांना प्रेरणा व रोजगाराच्या संधी मिळत असतात. सिमला उद्योग समुहाच्या माध्यमातून विविध व्यवसाय क्षेत्रातील पदार्पण कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


जावेद शेख म्हणाले की, सर्व ब्रँड कंपनीचे मोबाईल व ॲक्सेसरीज एकाच हाताखाली उपलब्ध होणार आहेत. नगरकरांना मोबाईलच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहे. मोबाईलसह हेडफोन, चार्जर, स्पीकर, मोबाईलचे पार्ट, तसेच विविध ॲक्सेसरीज योग्य दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उबेद शेख यांनी सिमला उद्योग समुह उद्योग व व्यवसाय क्षेत्राला चालना देण्याचे काम करत असून, शहराच्या वैभवात भर घालत असल्याचे सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *