शिक्षणाबरोबर विविध कलांचा विकास होणे काळाची गरज -मनोज कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे ज्ञानसाधना गुरुकुल व संपूर्ण स्वरानंद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानसाधना गुरुकुल संगीत विद्यालयाचे उद्घाटन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या हस्ते झाले.
मनोज कोतकर म्हणाले की, शिक्षणाबरोबर विविध कलांचा विकास होणे काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रामध्ये पालकांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केडगाव सारख्या ठिकाणी संगीत शिक्षण मिळत नसल्याने अनेक विद्यार्थांना व पालकांना या कलेपासून वंचित रहावे लागत होते. पण ज्ञानसाधना गुरुकुल संगीत विद्यालय मार्फत सर्व विद्यार्थांना संगीताचे धडे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गौरी शेळके, अदिती फलके, अखिलेश फलके, श्रुती चव्हाण, समृद्धी चव्हाण, भक्ती गुंड, वेदांत दैठणकर, कैवल्य कुलकर्णी, वरद कुलकर्णी, संदेश बेलदार या विद्यार्थांनी संगीताचे बहारदार सादरीकरण केले. प्रस्ताविकात प्रा. प्रसाद जमदाडे यांनी संगीत विद्यालयाचे उद्देश स्पष्ट केले.
पंडित महेश खोपटीकर म्हणाले की, अभ्यासा सोबत विद्यार्थांना कलेची आवड निर्माण व्हावी व त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासह सर्वांगीन विकास होण्यासाठी ज्ञानसाधना गुरुकुलचे संगीत विद्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर गोरगरीब व जिज्ञासू विद्यार्थांना अल्प दरात ही शिक्षण सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर परिसरातील भजनी मंडळ व जेष्ठ नागरिकांसाठी ही लवकर संगीताशी संबंधीत वर्गाचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्योजक संभाजी पवार, मुख्याध्यापक संदीप भोर, गोरख कोतकर, दिपक तागडे, प्राचार्यारुचिता जमदाडे, शबाना शेख, प्रा. शाहरुख शेख, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
