• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

अखिल वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हा शाखेचा शुभारंभ

ByMirror

Jun 6, 2024
अखिल वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हा शाखेचा शुभारंभ.

जिल्हा कार्यकारिणी जाहीर; जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. दत्ता फलके यांची नियुक्ती

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे अखिल वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हा शाखेचा शुभारंभ करण्यात आला. तर संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


जिल्हा शाखेच्या फलकाचे अनावरण राज्य अध्यक्ष ह.भ.प. बलभीम महाराज पठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे सचिव किशोर महाराज पठारे, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, लक्ष्मण चौरे, नामदेव फलके, कर्जत तालुकाध्यक्ष ह.भ.प. छगन महाराज गांगर्डे, भाऊसाहेब आनंदकर, बाबा खळदकर, ज्ञानदेव जाधव, काशीनाथ जाधव, तुलशीराम वाघुले, भाऊसाहेब कापसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


ह.भ.प. बलभीम महाराज पठारे म्हणाले की, अखिल वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाला एकत्र करुन ग्रामीण भागात धार्मिक व सामाजिक कार्याला चालना देण्याचे कार्य केले जाणार आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध धार्मिक सोहळे घेऊन सामाजिक प्रबोधनाचे कार्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.

तर समाजातील आजारी गरजू रुग्णांना मदत, सामुदायिक विवाह, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मंदिराचे जीर्णोध्दार, भजनी मंडळाला साहित्य देणे, धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विशेषत: संस्कारी समाज घडविण्यासाठी मुलांसाठी संस्कार शिबिर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर जाहीर करण्यात आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


अखिल वारकरी सेवा मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:-
जिल्हाध्यक्ष- ह.भ.प. दत्ता फलके, उपाध्यक्ष- तुकाराम फलके, कार्याध्यक्ष- गोरक्ष गायकवाड, उपकार्याध्यक्ष- चंद्रकांत जाधव, मार्गदर्शक- पै. नाना डोंगरे, निमगाव वाघा शाखा अध्यक्ष- ह.भ.प. विठ्ठल महाराज फलके, कार्यकारिणी सदस्य- गणेश जाधव, अतुल फलके, रघुनाथ डोंगरे, विजय जाधव, मारुती जाधव, छगन भगत, पोपट भगत, संतोष डोंगरे, भाऊसाहेब जाधव, तुळशीराम वाघुले, भास्कर उधार, दिगंबर जाधव, सुरेश जाधव, सतीश उधार.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *