• Tue. Dec 30th, 2025

सावेडीत ए. पी. लहामगे ॲण्ड कं. टॅक्सेशन ॲण्ड लिगल ॲडव्हायजर फर्मचे उद्घाटन

ByMirror

Dec 25, 2025

डिजिटल युगात कर विषयक जागरूकता अत्यावश्‍यक -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर सल्लागार क्षेत्रात विश्‍वासार्ह नाव असलेल्या ए. पी. लहामगे ॲण्ड कं. टॅक्सेशन ॲण्ड लिगल ॲडव्हायजर या फर्मच्या नगर-मनमाड रोडवरील सावेडी परिसरातील अद्यावत दालनाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व तारकेश्‍वर गडचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.


या फर्मचे प्रमुख कर सल्लागार आनंद लहामगे हे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून शहरात कर सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या प्रामाणिक, अचूक आणि पारदर्शक सेवेमुळे नागरिक, व्यावसायिक व उद्योजकांमध्ये वेगळा विश्‍वास निर्माण केला आहे. ग्राहकांना अधिक सुलभ, आधुनिक आणि डिजिटल सुविधांचा लाभ मिळावा, या उद्देशाने या नवीन दालनाची उभारणी करण्यात आली आहे.


उद्घाटनप्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात कर विषयक जागरूकता अत्यंत आवश्‍यक आहे. योग्य सल्ला, अचूक माहिती आणि पारदर्शक कामकाज हेच कोणत्याही व्यावसायिक प्रगतीचे खरे सूत्र आहे. आनंद लहामगे यांनी दिलेल्या प्रामाणिक सेवेच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली असून व्यावसायिक व उद्योजक क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र विश्‍वास संपादन केला आहे.”


यावेळी तारकेश्‍वर गडचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी नवीन दालनाच्या उद्घाटनाची घोषणा करत ए. पी. लहामगे ॲण्ड कं. फर्मच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


फर्मचे प्रमुख आनंद लहामगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कर सल्ला क्षेत्रात अचूकता, प्रामाणिकता आणि ग्राहक समाधान हेच आमचे प्रमुख ध्येय राहील. सामान्य नागरिकांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांना सुलभ, पारदर्शक व विश्‍वासार्ह सेवा देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. सध्याच्या जीएसटीसह किचकट कर प्रणालीतून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून उत्तम सेवा देण्याचे काम सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


या उद्घाटन सोहळ्यास उद्योजक सुधीर पोटे, माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, मनोज दुल्लम, दत्ता सप्रे, नितीन शेलार, श्‍याम नळकांडे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, शहर बँकेचे व्हार्इस चेअरमन प्रा. माणिक विधाते, माजी महापौर भगवान फुलसौफ्लदर, जयंत येलुलकर, सुनील रामदासी, तायगा शिंदे, बाळासाहेब बोराटे, श्रीनिवास बोज्जा, आशाताई कराळे, करण कराळे, संजय खामकर, उद्योजक अमित खामकर, गजेंद्र भांडवलकर, चिकूशेठ भिंगारदिवे, योगेश सोनवणे, अनिल निकम तसेच अहिल्यानगर जिल्हा टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष किशोर गांधी, उपाध्यक्ष सुनील कराळे, पुरुषोत्तम रोहिडा, अंबादास गाजुल, सरोदे, प्रसाद किंबहुने, निलेश किंबहुने, प्रशांत दारकुंडे, विपुल वाखुरे, ॲड. युवराज पोटे, ॲड. पालवे, ॲड. शिवाजी अनभुले यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, उद्योजक, व्यावसायिक, कर सल्लागार, लहामगे मित्र परिवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत प्रविण पुंजा लहामगे व राकेश पुंजा लहामगे यांनी केले, तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार त्यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *