विविध पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार
सेवा कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले -लताबाई फलके
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची ग्रामसभा सोमवारी (दि.14 ऑक्टोबर) पार पडली. सरपंच लताबाई फलके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
पै. डोंगरे यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय फेलोशीप सन्मान व जळगाव येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेचा राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकसेवा पुरस्कार डोंगरे सामाजिक संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. डोंगरे यांना व त्यांच्या संस्थेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच लताबाई फलके, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, उद्योजक दिलावर शेख, अनिल डोंगरे, ज्ञानदेव कापसे, अतुल फलके, दिपक गायकवाड, अरुण कापसे, सोमनाथ आतकर, गणेश येणारे, सुधीर येणारे, आदिल (गुड्डू) शेख, सचिन जाधव, संदेश शिंदे, संग्राम केदार, नवनाथ फलके, दिपक जाधव, पिंटू जाधव, अरुण काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच लताबाई फलके यांनी समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेले डोंगरे यांचे कार्य अभिमानास्पद आहे. सेवा कार्यातून डोंगरे यांनी गावचे नाव उंचावले असून, विविध क्षेत्रात त्यांना मिळालेला पुरस्कार हे गावासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी ग्रामस्थांनी पाठीवरती दिलेली कौतुकाची थाप आनखी समाजकार्य करण्यास बळ देणारी आहे. गावातील राजकारण बाजूला ठेऊन समाजकारण हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
