लवकरच ओबीसी जोडो यात्रा काढण्याची घोषणा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मात्र ओबीसीवर अन्याय नको ही राष्ट्रवादीची भूमिका -कल्याणराव आखाडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मात्र ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये, ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे. सर्व घटक जातींचा समावेश असलेल्या ओबीसींची लोकसंख्या 52 टक्के आहे. हा मोठ्या प्रमणातील समुह पक्षाच्या जोडण्यासाठी पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी ओबीसी विभागाची पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा सुरु असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आखाडे यांनी शहरात झालेल्या ओबीसी विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत संवाद साधून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी विभागाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, सामाजिक न्याय विभागचे सुरेश बनसोडे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ. रणजित सत्रे, राष्ट्रवादी माथाडी सेलचे ऋषी ताठे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, राष्ट्रवादीचे केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनाचे राज्य उपाध्यक्ष अनिल निकम, फुले बिग्रेड महिला अध्यक्ष रेणुका पुंड, स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे उद्धव शिंदे, शिवम भंडारी, मळू गाडळकर, जालिंदर बोरुडे, विलास शिंदे, निखिल शेलार, तुषार टाक, अभिजित ढाकणे, प्रमोद शेजुळ, अमोल बचकर, महेश आनंदकर, प्रदीप गारडे, प्रकाश इवळे, नारायण चिपाडे, लकी खुपचंदानी, राहुल फुलसौंदर, संतोष हजारे, विष्णु म्हस्के, अब्दुल खोकर,शाहनवाज शेख, बजरंग भुतारे, सोनु चिपाडे, नारायण इवळे, सागर होनराव, राहुल दळवी, अनिकेत आगरक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे आखाडे म्हणाले की, ओबीसी विभागाच्या राज्य दौऱ्याचा पहिला टप्पा संपला असून, दुसऱ्या टप्प्याचे प्रारंभ अहमदनगर शहरातून झाले आहे. नव्याने पदाधिकारी निवडताना जिल्ह्यात जावून बैठका घेतल्या जात आहे. तर स्थानिक पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य व सक्षम पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. ओबीसी मधील सर्व जाती पक्षाला जोडल्या गेल्यास पक्षाची मोठी ताकद उभी राहणार आहे. यासाठी ओबीसी मधील सर्व लहान-मोठ्या जातींना प्रतिनिधित्व देऊन त्यांना सन्मानाने बरोबर घेऊन जावे लागणार आहे. सामाजिक व भौगोलिक समतोल साधून कार्यकारणी निश्चित होणार आहे. एकाच भागातून व ठराविक समाजातून पदाधिकारी नसावा, या संकल्पनेने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार आहे. कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर ओबीसी जोडो यात्रा राज्यात काढून समाज जोडण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी शहर जिल्हाध्यक्ष खामकर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

शहरात आलेले कल्याणराव आखाडे यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. विशाल गणपती ट्रस्टच्या वतीने विश्वस्त प्रा. विधाते यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन आयुर्वेद महाविद्यालय येथे बैठक पार पडली.
प्रास्ताविकात प्रा. माणिक विधाते म्हणाले की, ओबीसी विभागाला नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून कामाला गती मिळणार आहे. या विभागात खामकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात उत्तमपणे संघटन व सामाजिक कार्य झाले असल्याचे स्पष्ट करुन, अशा सक्षम कार्यकर्त्याला पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ओबीसी विभागाचे माजी शहराध्यक्ष अमित खामकर यांनी कल्याणराव आखाडे यांच्याकडे ओबीसी विभागाची जबाबदारी आल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे. तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तीकडे नेतृत्व असल्यास कार्यकर्त्यांना ताकत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर या विभागाच्या माध्यमातून पुन्हा संधी मिळाल्यास जोमाने कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश बनसोडे यांनी राष्ट्रवादी सदस्य नोंदणी अभियानात खामकर यांनी राज्यात सर्वात जास्त नोंदणी केल्याचा राज्य पातळीवर सन्मान झाला. यातूनच त्यांच्या कार्याची ओळख होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. रणजीत सत्रे यांनी नागरिकांच्या आरोग्या दृष्टीने जनजागृतीचे उपक्रम सुरु असल्याचे स्पष्ट करुन डॉक्टर सेलचा मेळावा घेण्याचा मानस व्यक्त केला. प्रकाश इवळे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जात आहे. तर सारसनगरला सावित्रीबाई फुले नगर नाम करणाचा घेतलेल्या ठरावाचे स्वागत केले. वैभव ढाकणे यांनी शहरात राष्ट्रवादीच्या सर्व विभागाचे उत्तम प्रकारे कार्य सुरू आहे. शहरात राष्ट्रवादी पक्ष वाढविणारे, दोन वेळा महापौर व आमदार राहिलेले आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळण्याची कार्यकर्त्यांच्या मनापासून इच्छा असल्याचे सांगितले.