संस्थेच्या नवीन कार्यकारणीची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- भृंगमहाऋर्षी विकास प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शहरातील नालेगाव येथे पार पडली. या सभेत बहुमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले. तर संस्थेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.
गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी भृंगमहाऋर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सभासदांचे स्वागत संस्थेचे खजिनदार पोपट रासकर यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी संस्थेचे ध्येय धोरण व संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट करुन गणेशनगर मध्ये चांगल्या प्रकारे शाळा, हॉस्पिटल, अंगणवाडी होण्यासाठी आणि आरोग्य आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रतिष्ठान निस्वार्थ भावनेने कार्य करत असल्याचे सांगितले.
संस्थेचे सचिव पोपट शेळके यांनी गेल्या पाच वर्षाचा लेखा-जोखा सादर करुन विषय पत्रिकेतील सर्व विषयावर चर्चा करून सर्वांच्या बहुमताने विषय मंजूर करण्यात आले. संस्थेच्या नवीन विश्वस्तांची निवड करुन जुन्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा फेरनिवड झाली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी काम पाहिले.
भृंगमहाऋर्षी विकास प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे:- अध्यक्ष- गणेश शिंदे, उपाध्यक्ष- अनिल राऊत, सचिव- पोपट शेळके, खजिनदार पोपट रासकर, सदस्यपदी अनिल सोनवणे, संजय वाघस्कर, शंकर गायकवाड, ठकाराम ताबडे, रूपाली मंचीकटला, विमल जगताप, मंदा लोखंडे.