गुणवत्ता यादीत 99 विद्यार्थ्यांचा समावेश; पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्तायादीत
सलग तीन वर्ष सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम कौतुकास्पद -दादाभाऊ कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे 99 विद्यार्थी राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत चमकले असून, त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान शाळेने पटकाविला असून, 6 विद्यार्थी राज्याच्या तर 20 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तर शहराच्या गुणवत्ता यादीत 73 विद्यार्थी चमकले आहे.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, जनरल बॉडी सदस्य अभिषेक कळमकर, अर्जुन पोकळे, श्याम व्यवहारे, कैलास गुंजाळ, जयद्रथ खाकाळ, अंबादास गारुडकर, तुषार साठे, प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे आदींसह शालेय शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या एकत्रित कष्टाने स्पर्धा परीक्षेत मुले चमकत आहे. विद्यालयाने सलग तीन वर्ष जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा केलेला विक्रम संस्थेच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. शिक्षण क्षेत्रात असलेले सातत्य व कष्टातून गुणवत्ता निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिषेक कळमकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनावर विद्यार्थ्यानी भर द्यावा. वाचनाने मन एकाग्र व बुध्दी प्रगल्भ होते. वाचन व एकाग्रतेने केलेला अभ्यास शिक्षणात गुणवत्ता निर्माण करत असल्याचे सांगून, त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे आवाहन केले. ज्ञानदेव पांडूळे यांनी या शाळेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत असून, त्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
मंथन प्रज्ञाशोध परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक- गार्गी संतोष ठाणगे (इयत्ता पहिली), राज्यात दुसरा क्रमांक- विनय नाबगे, प्रथमेश होले, सरफराज शेख (सर्व. इयत्ता दुसरी), राज्यात पाचवा क्रमांक- संस्कृती कापरे (इयत्ता दुसरी) यांनी मिळवला आहे. तर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता पहिली- रुद्र गुंजाळ, श्रीराज गुंजाळ, आराध्या जाधव, वरद नाबगे, इयत्ता दुसरी- आरोही सोनवणे, सिध्दवेदाय पेंडभाजे, आदिराज दराडे, आस्था सुंबे, अनुष्का धामणे, पार्थ जाधव, स्वरा दरेकर, वेदांत राहिंज, विराज काठमोरे, अर्श शेख, आयुष सोनमाळी, राजनंदिनी गांगर्डे, इयत्ता तिसरी- किर्ती शिरसे, अर्णव बोरुडे, इयत्ता चौथी- ईशान पालवे, रिओ शेख यांच्यासह शहराच्या गुणवत्ता यादीत चमकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना उर्मिला साळुंखे, मीनाक्षी खोडदे, सुजाता दोमल, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, शिल्पा कानडे, सोनाली अनभूले, रूपाली वाबळे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शाळेचे पालक वर्गातून कौतुक व अभिनंदन होत आहे.