प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ
प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा -संजय सपकाळ
हरदिन मॉर्निंग ग्रुपने केली पर्यावरण दिनी 40 झाडांची लागवड
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ
प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये 40 झाडांचे वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. रोकडेश्वर हनुमान मंदिर, गुरुद्वारा, राधाकृष्ण मंदिर व जॉगिंग पार्क परिसराची स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीसाठी नागरिकांना शपथ देण्यात आली. यावेळी लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील ग्रुपच्या सदस्यांनी घेतली.

स्व. मच्छिंद्र विठोबा भांड (बाबूजी) यांच्या स्मरणार्थ पोपटराव विठोबा भांड परिवाराच्या वतीने 40 झाडांची भेट देण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन सप्ताहातंर्गत ग्रुपच्या वतीने सदर कार्यक्रम घेण्यात आला. उद्यानाच्या ठिकठिकाणी झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सीए रवींद्र कटारिया, सीए श्रेयांश कटारिया, जहीर सय्यद, रमेशराव वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, संजय भिंगारदिवे, दिलीप गुगळे, अभिजीत सपकाळ, ईवान सपकाळ, राजू कांबळे, संतोष वीर, पवन वाघमारे, अतुल वराडे, डॉ. नानासाहेब अकोलकर, प्रशांत चोपडा, रतनशेठ मेहेत्रे, अशोकराव पराते, सुधीरशेठ कपाले, रमेशराव साके, गणेशराव भोर, मुन्ना वाघस्कर, दीपक मेहतानी, विनोद खोत, दीपकराव बडदे, कोंडीराम वाघस्कर, निजाम पठाण, विठ्ठल राहिंज, अविनाश जाधव, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, दिपकराव घोडके, सरदारसिंग परदेशी, किरण फुलारी,
विकास भिंगारदिवे, सूर्यकांत कटोरे, कुमार धतुरे, रामनाथ गर्जे, सूर्यकांत पांढरे, नंदलाल परदेशी, दिनेश शहापूरकर, जालिंदर बेरड, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, विलास मिसाळ, जयराम मेहतानी, दशरथ मुंडे, श्रीवास्तव, योगेश चौधरी, सिताराम परदेशी, विजय महाजन, बाळासाहेब झिंजे, तुषार घाडगे, अजेश पुरी, संदीप शिंगवी, सागर काबरा, सचिन कस्तुरे, उमाशंकर पंडित, विशाल भामरे, दीपक गायकवाड, गोरक्षनाथ पुंड आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षारोपणाने सुरक्षित करता येणार आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासह पशु-प्राण्यांना हानी पोहचवत आहे. प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षण म्हणजेच सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.