शालेय विद्यार्थ्यांसह बालदिन साजरा; निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांना योगाचे धडे
महापुरुषांच्या योगदानाने सशक्त भारत घडला -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारमध्ये स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरु व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच अ.ए.सो. च्या नवीन मराठी शाळेत बालकांना गुलाबपुष्प व खाऊचे वाटप करुन बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे धडे देण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, रमेश वराडे, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, रतनशेठ मेहेत्रे, सुधीर कपाळे, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, भिंगार हायस्कूल प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख अर्चना गायकवाड, शोभा गायके, पूजा लिंबीकर, कल्याणी धाडगे, वैशाली विधाते, सुजाता अंगरखे, विलास आहेर, दीपकराव घोडके, अविनाश जाधव, अशोक पराते, भरत दंडोरे, प्रज्योतसिंग सागू, दशरथराव मुंडे, सरदारसिंग परदेशी, सुभाष पेंढुरकर, मुन्ना वाघस्कर, दीपक मेहतानी, रामदास घडसिंग, शिरीष पोटे, अशोकराव दळवी, सखाराम अळकुटे, संतोष लुणिया, सुहास देवराईकर, रमेश कोठारी, योगेश चौधरी, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, दीपकराव धाडगे, राजू कांबळे, योगेश हळगावकर, संतोष वीर, संजय शिरसाठ, मुकेश मुथीयान, रामनाथ गर्जे, विनोद खोत, अजय खंडागळे, विकास निमसे आदींसह ग्रुपचे सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, भारत भूमीच्या प्रत्येक नागरिकावर महापुरुषांचे ऋण कायम राहणार आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सवामुळे त्यांच्या इतिहासातील घडामोडींना उजाळा मिळून प्रेरणा व दिशा मिळत असते. क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे अतिशय शूरवीर लढवय्ये व्यक्तिमत्त्व होते. अन्यायाविरोधात बंड करण्यासाठी आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन चोपडा म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मोठे योगदान दिले. त्यांना बालके प्रिय असल्याने त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. सक्षम भारताची मुहुर्तमेढ पंडित जवाहरलाल नेहरु यांनी रोवली. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन भारताला विकासाच्या दिशेने नेले. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लहुजी वस्ताद साळवे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीकारक घडवले. त्यांचे कार्य युवकांना प्रेरणादायी आहे. ह.भ.प. ज्ञानेश्वर अनावडे महाराज यांनी बालदिनाचे महत्त्व विशद करुन बालकांना शुभेच्छा दिल्या.
