मंदिर हे असे एक माध्यम आहे जिथे सर्व समाज एकत्र येतो -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गाव व शहरात मंदिर हे असे एक माध्यम आहे जिथे सर्व समाज एकत्र येतो. मंदिरातून सर्वजण एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे मंदिराचे अस्तित्व आणि त्याचा जिर्णोद्धार ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शहरातील डावरे गल्ली येथे असलेल्या श्री पावन मुंजोबा गणेश मंदिराच्या जिर्णोद्धार कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, मनीष साठे, संग्राम रासकर, गोविंद मिसाळ, लक्ष्मण खामकर, लंकेश हरबा, सतीश हरबा, वसंत शेलार, आरतीताई रासकर, बाळासाहेब मिसाळ, ओंकार घोलप, योगेश मिसाळ, रुपेश हरबा, उमेश गीते, राहुल पंगुडवाले, शंकरराव पंगुडवाले, उमेश मिसाळ, आसाराम रासकर, श्रीकांत पेंटा, माधवराव ढवळे, किशोर मुथा, विजय शेलार, भरत चांडवले, विठ्ठल गाढवे, सुभाष जवळेकर, विलास गीते यांच्यासह परिसरातील महिला व सहकार्य तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, शहरातील काही भागात हिंदू बांधवांना टार्गेट करून परिसर सोडावा लागला होता. मात्र आता एकाही हिंदूंना कोणत्याही भागातून स्थलांतर करावे लागणार नाही. त्यांच्या मागे नाही तर पुढे उभे राहण्याची जबाबदारी आमची आहे. धर्मासाठी संघर्षाची वेळ आली, तर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सौ. आरती संग्राम रासकर यांनी मंदिर जिर्णोद्धार कार्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करुन पुढील पिढ्यांसाठी आपल्या संस्कृतीचा वारसा जपणे व वाढवणे आपली जबाबदारी असल्याचे म्हणाले.
या जिर्णोद्धार कार्याचा पुढाकार सौ. आरती संग्राम रासकर व रासकर परिवाराच्या वतीने घेण्यात आला आहे. पाहुण्यांचे स्वागत संग्राम रासकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मिसाळ यांनी केले. आभार रुपेश हरबा यांनी मानले.