बाबासाहेबांच्या संविधानाने देशात समता व न्यायव्यवस्था प्रस्थापित -अमित काळे
नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी च्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवक आघाडीचे अमित काळे, विलास साठे, माजी सरपंच युवराज पाखरे, गौतम कांबळे, महेश भिंगारदिवे, महादेव भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, निखील सुर्यवंशी, दया गजभिये, सुधाकर उमाप, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची क्रांती करुन दीन-दलितांना न्याय मिळवून दिला. उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांच्यामुळे मिळाला असून, त्यांच्या संविधानाने देशात समता व न्यायव्यवस्था प्रस्थापित झाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या विचार व प्रेरणेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
