संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळून प्रचंड पराक्रम गाजवला -पै. नाना डोंगरे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भाऊसाहेब (पिंटू) जाधव, अतुल फलके, अनिल डोंगरे, बबन शेळके, दत्ता ठाणगे, अजय ठाणगे, संग्राम केदार, ज्ञानदेव कापसे, भाऊराव जाधव, सुनिल कापसे, संतोष खांदवे, बंटी निमसे, मयुर काळे आदींसह गावातील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, संभाजी महाराजांचे जीवन आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. संपूर्ण आयुष्यात त्यांनी संघर्ष करुन व संकटावर मात करुन समर्थपणे पाय रोवून उभे राहिले. स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळून प्रचंड पराक्रम त्यांनी गाजवला. सर्वगुण संपन्न व विविध क्षेत्रात पारंगत असलेल्यांनी संभाजी महाराजांनीनिर्विवाद वर्चस्व गाजवून एक आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.