महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महात्मा फुले यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी शिक्षणाची चळवळ उभी केल्याने देशात प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे आले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांनी सामाजिक परिवर्तन घडविले. या महापुरुषांच्या विचाराने राज्य मार्गक्रमण करत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सकल माळी समाज ट्रस्ट व क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतीबा फुले स्मारक कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या 134 व्या स्मृतीदिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी सकल माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागवाले, फुले स्मारक कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सकल माळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, डॉ. रणजीत सत्रे, ज्ञानेश्वर रासकर, बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली (मामा) गायकवाड, संजय सपकाळ, अमित खामकर, दीपक खेडकर, पंडितराव खरपुडे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, विनोद पुंड, श्रद्धा जाधव, रेणुका पुंड, अनिल इवळे, मच्छिंद्र बनकर, भाऊसाहेब कोल्हे, राजेंद्र पडोळे, सुरेश लोळगे, आनंद पुंड, मनोज भुजबळ, रोहित पठारे, किरण जावळे, बजरंग भुतारे, गणेश बनकर, नितीन डागवाले, मळू गाडळकर, संतोष हजारे, राजाराम चिपाडे, गजानन ससाणे, अर्जुन बोरुडे, अशोक हिंगे, किरण मेहेत्रे, संजय ताठे, आकाश डागवाले, रमेश चिपाडे, गणेश कोल्हे, कॅप्टन सुधीर पुंड, किरण मेहेत्रे, संजय ताठे, आकाश डागवाले, किरण पंधाडे, अभिजीत सपकाळ, भावेश माळी, विक्रम बोरुडे आदी उपस्थित होते.
किशोर डागवाले म्हणाले की, थोर समाज क्रांतिकारक, बहुजनांचे उद्धारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर कार्य करण्याची गरज आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी आपले आयुष्य समाजात समानता, न्याय, शिक्षण व समाजसेवेसाठी वेचले. या महापुरुषांच्या विचाराने समाजाला योग्य दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महात्मा फुले समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतिकारक होते. समता, न्याय व हक्कासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. शिक्षणाची ज्योत प्रज्वलीत करुन त्यांनी सर्वांचे जीवन प्रकाशमय केले. त्यांचे विचार व कार्य सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी असून, ते आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
