शहरात राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रातील कर्तुत्ववानांचा सन्मान करण्यासाठी ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अवार्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवारी दि. 11 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर मधील सावेडीच्या माऊली सभागृहात रंगणार आहे. विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींना सदर पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात कलाविष्कार पुरस्कार, युथ आयकॉन, महाराष्ट्र क्रिडा आयकॉन, महाराष्ट्र उद्योगरत्न, महाराष्ट्र आदर्श शिक्षकरत्न, महाराष्ट्र कृषीभूषण, महाराष्ट्र समाजरत्न, महाराष्ट्र एनजीओ आयकॉन अवॉर्ड, सोशल वर्कर आयकॉन, राज्यस्तरीय उपक्रमशील ग्रामपंचायत पुरस्कार, महाराष्ट्र आदर्श सरपंच, महाराष्ट्र आदर्श ग्राम पुरस्कार, बालशौर्य आदी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
नामांकने पाठवण्यासाठी https://forms.gle/mvKuobDB4HPXDEjL7 या संकेत स्थळाला भेट देऊन माहिती भरावयाची आहे. अधिक माहितीसाठी 9423673591, 9653381684 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.