• Mon. Jul 21st, 2025

पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

ByMirror

Feb 23, 2024

पुरस्कार आनखी चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन देतात -प्रल्हाद गिते

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक क्षेत्रात विविध माध्यमातून निस्वार्थ योगदान देणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शहर वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड व सामाजिक वनीकरणचे वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी गझलकार रज्जाक शेख, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, उपसरपंच प्रमोद जाधव, डॉ. विजय जाधव, सोसायटीचे चेअरमन गुलाब कापसे, दिलावर शेख, अतुल फलके, जालिंदर आतकर, मयुर काळे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते म्हणाले की, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना मिळालेला पुरस्कार हा आनखी चांगले कार्य करण्यास प्रोत्साहन देत असतो. या कार्यक्रमातून पोलीस दल व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे मनोबळ वाढविण्याचे कार्य करण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सुरु असलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करताना सामाजिक कार्यकर्त्यांची जाणीव ठेऊन त्यांना पुरस्काररुपाने प्रोत्साहन देण्यात आले आहे. तर सर्वसामान्यांचे रक्षण करणारे पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करनारे अधिकारी यांना देखील सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमात विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणारे उद्योजक बाळासाहेब शहाणे, कवयित्री वैशाली कंकाळ, स्मिता गायकवाड, शिवदास कांबळे, शिवशाहीर अभय जावळे, विक्रम अवचिते, ओवी काळे, नामदेव साबळे, शांता दहातोंडे, शहाराम आगळे, लक्ष्मण काशिद, देवीदास बुधवंत, अशोक भालके, निखील शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर शाहिरी जलसा सादर करणारे कलाकार व कवींचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा सोनवणे यांनी केले. आभार संदीप डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *