उच्च शिक्षित होवून भरारी घेण्याचे आवाहन
शिक्षणाबरोबरच संस्कृती व संस्कार तितकेच महत्त्वाचे -बबन कोतकर
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आलेल्या मुलींचे स्वागत करुन मुलींना उच्च शिक्षित होवून भरारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
इयत्ता 5 वी ते 9 वी मधील सर्व विद्यार्थिनी विद्यालयात प्रविष्ठ झाल्या. शाळेत आलेल्या नवोदित मुलींचे पाठयपुस्तके तसेच शालेय उपयोगी साहित्य देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी राजर्षी शाहू संस्थेचे सचिव बबन कोतकर म्हणाले की, विद्यार्थिनीच्या शालेय दशेत योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ते काम शिक्षक वृंद करत असतात. त्या माध्यमातून चांगल्या विद्यार्थिनी घडवल्या जातात, सक्षम झालेल्या मुली भारताचे उज्वल भविष्य आहे. विद्यालयामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, त्यांना चांगल्या दर्जेचे शिक्षण दिले जात आहे. शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती व संस्कार तितकेच महत्त्वाचे असून, ते जोपासण्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयच्या प्राचार्या वासंती धुमाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनभारती गुंड यांनी केले. आभार छाया सुंबे यांनी मानले. यावेळी संस्थेचे सहसचिव रावसाहेब सातपुते, खजिनदार प्रल्हाद साठे, संचालक दगडू साळवे, जयश्री कोतकर आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.