जायंट्स राज्यस्तरीय संमेलनात सामाजिक कार्याचा नगरी डंका
संजय गुगळे यांचा सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्डने सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे फेडरेशन 2 बी चे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला सामाजिक कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट कार्याचे प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन चे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांना सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी दिली.
या संमेलनात विश्व उपाध्यक्ष विजय चौधरी व प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जीवन राजपूत यांच्या हस्ते संजय गुगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विनोद शेवतेकर, सूर्यमाला मालानी, जगन्नाथ साळुंके, डॉ. गुरूदत्त राजपूत, संतोषी भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गेल्या 40 वर्षांपासून शहरात जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात ग्रुप तर्फे योगदान दिले जात असून, वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन ग्रुपला राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अधिवेशनात ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सचिव अमित मुनोत, अनिल गांधी, अभय मुथा, अमित धोका, पूजा पातूरकर, विद्या तन्वर, नूतन गुगळे, आशा कवाने आदी उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रुपच्या सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.