अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरचा उपक्रम
ग्लॅमरच्या युगात मेकअप आर्टिस्टना महत्त्व -अलका गोविंद
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लॅमरच्या युगात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे. त्यामुळे मेकअप आर्टिस्टना महत्त्व प्राप्त झाले असून, यातून महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. समोरच्या व्यक्तीचे सौंदर्य खुलविण्याचे काम मेकअप आर्टिस्ट करत असतो. स्पर्धामय ग्लॅमर युगात झपाट्याने नवनवीन तंत्रज्ञानामुळे बदल घडत असून, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना बदल स्विकारण्याचे आवाहन इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांनी केले.
अहिल्या फाउंडेशन आणि अहिल्या मेकओव्हरच्या वतीने सावेडीत महिलांसाठी घेण्यात आलेल्या मोफत मेकअप आणि हेअर स्टाईल प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना गोविंद बोलत होत्या. या प्रशिक्षण वर्गाला महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षणात गोविंद यांनी महिलांना सिग्नेचर ब्रायडल लुक, वॉटरप्रूफ मेकअप, इंटरनॅशनल आय मेकअप व इंटरनॅशनल हेअर स्टाईलचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली. अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांनी महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने अहिल्या फाउंडेशन व अहिल्या मेकओव्हरच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. ब्युटी पार्लरचे अद्यावत प्रशिक्षण देवून महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
