आषाढी एकादशी व शाहू महाराज जयंतीचा उपक्रम
महिलांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी आणि राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 27 जून रोजी सकाळी 9 वाजता गावातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या सभामंडपात या शिबिराला सुरुवात होणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन जयश्री नर्सिंग होम (भागीरथी हॉस्पिटल), स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ तसेच धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जयश्री रौराळे या महिलांची वैद्यकीय तपासणी करणार असून, त्यांना विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन देखील करणार आहे. महिलांच्या विविध आजारांबाबत योग्य निदान, उपचार पद्धती, नियमित तपासणी, आहार व व्यायाम यावर डॉ. रौराळे सविस्तर माहिती देतील.
या शिबिराचा पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले आहे. शिबिर पूर्णतः मोफत असून नाव नोंदणी अनिवार्य आहे. इच्छुक महिलांनी डॉ. जयश्री रौराळे 96075 28528 व पै. नाना डोंगरे 86057 75261 यांच्याशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.