नगर (प्रतिनिधी)- जेऊर बायजाबाई (ता.नगर) येथील (सध्या रा. अहिल्यानगर) फकीरा भागाजी पाटोळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत फकीरा पाटोळे हे जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या परिवाराचा सामाजिक व राजकीय वारसा आहे. ते भाजप शहर सचिव चंद्रकांत पाटोळे व रिपब्लिकन पक्षाचे नेते नानासाहेब पाटोळे यांचे वडील होते.
