विद्यार्थ्यांनी केली गुणवत्ता सिध्द
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नीट, जेईई व सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रजत अकॅडमी (पुणे) यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
नीट परीक्षेमध्ये इफ्राफातेमा फारुख शेख हिने 466 गुण मिळवून ती ऑल इंडिया रँक मध्ये पीडब्ल्यूबीडी प्रवर्गामध्ये 90 वी आली आहे. तसेच सार्थक सचिन कुलकर्णी याने 453 व अपाला सुनिल कुलकर्णी हिने 418 गुण मिळवले आहेत.
जेईई परीक्षेमध्ये हर्ष गणेश यादव (85.15%) व यश तानाजी कांबळे (76%) हे दोघेही जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. नकुल धीरज फिरोदिया याने 82.15 % व दुर्गेश गणेश साळुंके याने 77.98% गुण मिळवले आहेत.
सीईटी परीक्षेमध्ये सार्थक सचिन कुलकर्णी (99.77%), इफ्राफातेमा फारुख शेख (99.60%), अपाला सुनील कुलकर्णी (98.91%), उत्कर्ष नितीनकुमार शेटीया (96.33%), दुर्गेश गणेश साळुंके (96.17%), प्रांजल संतोष कोल्हे (93.91%), दिलीप उमेश साळी (92.78%), श्रेयशी इंद्रजीत राहणे (91.44%), साहिल संतोष पवार (91.27%) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, रजत ॲकॅडमीचे संचालक चंद्रशेखर निकम, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे प्राचार्य उल्हास दुगड, रूपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयाचे प्राचार्य अजय बारगळ, अशोकभाऊ फिरोदिया स्कूलचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.