• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

ByMirror

Sep 9, 2024
निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन

व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनासाठी केली जाणार जागृती

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शाडूच्या मातीच्या गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.


डोंगरे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, अजिंक्य वाबळे, राहुल कापसे, कृष्णा डोंगरे, कार्तिक डोंगरे, शिवा डोंगरे, दादा डोंगरे आदी उपस्थित होते.


गणेश उत्सवानिमित्त निमगाव वाघात संस्थेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती व पर्यावरणाच्या जागृतीसाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करुन मतदार जागृती, स्त्री जन्माचे स्वागत, स्त्री सक्षमीकरण, व्यसनमुक्तीचा संदेश दिला जाणार आहे. युवकांसाठी स्वच्छता अभियान व वृक्षरोपण अभियान देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे व प्रभारी ग्रंथालय संचालक (मुंबई) अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *