कमल वाघमारे यांची नेवासा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष -सुशांत म्हस्के
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात पानेगाव (ता. नेवासा) येथील महिला व युवकांनी प्रवेश केला. सर्व महिला व युवकांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर कमल वाघमारे यांची नेवासा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पवार, संपदा म्हस्के, विनीत पाडळे, फ्रान्सिस पवार, सोनाली पवार, अमृता पवार आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशांत म्हस्के म्हणाले की, जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील महिला व युवक असुरक्षित असून, जिल्ह्यात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहे. जातीय अत्याचार रोखण्यासाठी रिपाईच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष सुरु आहे. जातीयवादी राजकारणी सर्वसामान्यांच्या प्रश्नाऐवजी धार्मिक प्रश्न उपस्थित करुन नागरिकांचे विचार भरकटविण्याचे काम सुरु आहे.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने रिपाई सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्योतीताई पवार यांनी महिलांना रिपाईमध्ये सन्मानाची वागणुक देऊन महिलांच्या प्रश्नावर कार्य सुरु आहे. अन्यायाला वाचा फोडून वंचित, पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपाई कटिबध्द असून, महिलांनी अन्याय सहन न करता त्या विरोधात आवाज उठविण्याचे सांगितले.
यावेळी नुतन नेवासा तालुकाध्यक्षा वाघमारे यांच्यासह जया वाघमारे, नंदा वाघमारे, पूजा वाघमारे, शोभा वाघ, अर्चना वाघ, भिमबाई वाघमारे, सखू वाघमारे, विमल वाघमारे, कुसुम वाघमारे, छाया वाघमारे, रंजना वाघमारे, चंदा वाघमारे, अनिता वाघमारे, अनिता बिरसने, वच्छलाबाई शेंडगे, लता शेंडगे, कांता शेंडगे, सुनील भवार, संजय पवार, भाऊसाहेब वाघमारे, अनिल वाघमारे, संजय वाघमारे, रमेश शेंडगे, राजू वाघमारे, सतिष वाघमारे, राजेंद्र शेंडगे, संजय शेंडगे, विजय वाघ, बाळू बिरसने आदींनी रिपाईमध्ये प्रवेश केला.