• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

कै. गुरुवर्य पोट्यन्ना बत्तीन शैक्षणिक व सामाजिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

ByMirror

Jun 17, 2026
अध्यक्षपदी नारायण मंगलारम व सचिवपदी श्रीनिवास यल्लारम

अध्यक्षपदी नारायण मंगलारम व सचिवपदी श्रीनिवास यल्लारम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कै. गुरुवर्य पोट्यन्ना बत्तीन शैक्षणिक व सामाजिक मंडळाच्या सदस्यांची नुकत्याच पार पाडलेल्या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या सभेत मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांनी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते नारायण मंगलारम यांची अध्यक्षपदासाठी सूचना केली. तसेच मंडळाचे माजी सचिव प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांनी श्रीनिवास यल्लारम यांची सचिव पदासाठी सूचना केली. उपस्थित सदस्यांनी एकमताने या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सहमती दर्शवली.


तसेच यावेळी उपाध्यक्षपदी सदाशीव बत्तीन, विनायक बत्तीन, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्‍वर मंगलारम, सहसचिव कृष्णा संभार, खजिनदारपदी शंकर नक्का, हिशोब तपासनीसपदी भुमय्या नक्का यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या वतीने दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिन व पदवीधर विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ साजरे केले जातात. तसेच इतर शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *