• Tue. Jul 22nd, 2025

सुनील साळवे यांना राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर

ByMirror

Mar 10, 2024

मुख्यमंत्रीच्या हस्ते होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजात सामाजिक कार्य करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांना राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.


मंगळवारी (दि.12 मार्च) रोजी नरिमन पॉईंट मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) जमशेदजी बाबा नाट्यगृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात साळवे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


सुनील साळवे यांचे रिपाईच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्गीय समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी ते योगदान देत आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले, राज्य सरचिटणीस अविनाश महातेकर, सिमाताई आठवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाज कल्याण उपायुक्त राधाकिसन देवढे, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, ना. आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, विभागीय अध्यक्ष भिमा बागुल, जिल्हा नेते रमेश गायकवाड, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, जिल्हा कार्याध्यक्ष लॉरेन्स स्वामी, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, जेष्ठ नेते संजय कांबळे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवक जिल्हा सरचिटणीस गौरव साळवे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, जामखेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कर्जतचे सतीश भैलुमे, अंकुश भैलुमे, रवी दामोदरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अमोल सोनवणे, श्रीगोंदा शहराध्यक्ष विशाल घोडके, पप्पू घोडके, जामखेड तहसिलदार माळी, पोलीस निरिक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आदींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *