• Mon. Jan 26th, 2026

बैसाखीनिमित्त लंगर सेवेच्या वतीने मिष्टान्न भोजनासह सरबतचे वाटप

ByMirror

Apr 15, 2024

ॲड. भावना आहुजा-नय्यर यांचा सत्कार

लंगर सेवेच्या सेवादार ॲड. भावना यांनी मिळवलेले यश सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद -हरजितसिंह वधवा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात बैसाखी सण साजरा करण्यात आला. अन्न छत्रालयाच्या माध्यमातून गरजूंना मिष्टान्न भोजनासह सरबतचे वाटप करण्यात आले. लंगर सेवेच्या माध्यमातून साजरे करण्यात येणारे सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.


तर लंगर सेवेच्या सेवादार असलेल्या ॲड. भावना आहुजा-नय्यर यांनी एलएल.एम. परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ. सिमरन वधवा यांनी केला. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, प्रशांत मुनोत, मुन्नाशेठ जग्गी, गुलशन कंत्रोड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, अभिमन्यू नय्यर, जतीन आहुजा, ज्योती नय्यर, सुनीता आहुजा, श्रीमती जग्गी, हरमन वधवा, रिद्धी धुप्पड, रजनी चोपडा, अवयान नय्यर, हर्षनूर धुप्पड आदी उपस्थित होते.


हरजितसिंह वधवा म्हणाले की, गरजूंना पोटभर जेवणाचे फुड पॅकेट देण्यासह त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम देखील लंगर सेवा करत आहे. नगरकरांनी दिलेल्या सहयोगामुळे ही सेवा अविरतपणे सुरु आहे. लंगर सेवेच्या सेवादार असलेल्या ॲड. भावना आहुजा-नय्यर यांनी मिळवलेले यश सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रितपालसिंह धुप्पड म्हणाले की, प्रत्येक सामाजिक कार्यात व लंगर सेवेत जनक आहुजा परिवाराचे मोठे योगदान आहे. धार्मिक व सामाजिक कार्यात ते सातत्याने हातभार लावत आहे. त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांची मुले करत असून, विविध क्षेत्रातही यश मिळवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जनक आहुजा म्हणाले की, लंगर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य गरजू घटकांसह सण-उत्सवाचा आनंद साजरा केला जातो. दुर्बल घटकांना सणाचा आनंद मिळावा व त्यांचा सण-उत्सव गोड करण्याच्या उद्देशाने या पध्दतीने लंगर सेवा उपक्रम राबवित आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेल्या या सेवेला सर्वसामान्यांचा प्रतिसाद व देणगीदारांची देखील साथ मिळत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *