दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न करावे -प्रशांत गायकवाड
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हयातील 10 दिव्यांग मतिमंद मुलांचे कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नॅशनल ट्रस्ट फॉर वेलफेअर ऑफ परर्सन्स विथ ऑटीझम सेरेबल पाल्सी मेंटल रिटायर्डेशन ॲण्ड मल्टीपल डिसेंबीलीटी ॲक्ट 1999 च्या कायदयातील कलम 14 (4) मधील तरतुदी नुसार जिल्हा परिषद येथील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय येथे हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रशांत गायकवाड म्हणाले की, कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचा उपयोग पालकांनी केंद्रशासन व राज्यशासनामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळवून देण्याबाबत व दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न करावा. दिव्यांग पाल्याचे भवितव्य उज्वल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी नंदकिशोर बळीराम शिवशरण, अनिल किसन कडलग, अश्पाक गफूरभाई शेख, संदीप एकनाथ देठे, मनिषा किशारे शिंदे, रेश्मा सोपान तारडे, शबनम शेख, शिवाजी गागरे, विदया नांगळ, तरन्नुम खान आदी दिव्यांग व्यक्तींच्या पालकांना कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कायदेशीर पालकत्व देण्यामध्ये स्थानियस्तर समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे विशेष सहकार्य लाभले.पालक अनिल कडलग सरांनी जिल्हाधिकारी दिव्यांग सक्षमीकरण कक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
दिव्यांगाप्रती असलेली तळमळ प्रेत्येक कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून जाणवल्याचे सांगितले. या कार्यक्रमास सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, मुख्याध्यापक सचिन तरवडे, विजय बळीद, गिन्यानदेव जाधव, सुयोग निमसे, शिवानंद भांगरे आदींसह दिव्यांग मुलां-मुलींचे पालक उपस्थित होते.
