• Wed. Oct 29th, 2025

श्रमिक कष्टकऱ्यांच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Jun 23, 2024

यशवंती मराठा महिला मंडळाचा मार्कंडेय शाळेत उपक्रम

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय विद्यालयातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण घेणाऱ्या कष्टकरी कामगार वर्गातील मुलांना शिक्षणासाठी या उपक्रमाद्वारे प्रोत्साहन देण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका दिपालीताई बारस्कर, संस्थापिका अध्यक्षा मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्षा गीतांजली काळे, उपाध्यक्षा कविता दरंदले, शहराध्यक्षा मिराताई बारस्कर, माजी शहराध्यक्षा आशाताई शिंदे, मेघाताई झावरे, राधिका शेलार, मंगलाताई काळे, राजश्री पोहेकर, लता भापकर, आशाताई कांबळे, अपर्णा शेलार, मीनाक्षी जाधव, मार्कंडेय शाळेच्या मुख्याध्यापिका विद्याताई दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे, लीनाताई नेटके, डॉ. संध्या इंगोले आदींसह महिला सदस्या, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिपालीताई बारस्कर म्हणाल्या की, यशवंती मराठा महिला मंडळ समाजातील सर्वसामान्य महिला व विद्यार्थी वर्गाच्या विकासात्मक दृष्टीकोनाने घेत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या एकत्रित मेहनतीने विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. मुलांपेक्षा मुली शिक्षणात आघाडीवर असल्याचे अभिमान वाटत आहे. परिस्थिती माणसाला घडवते मार्कंडेय विद्यालयातील कष्टकरी श्रमिकांची मुले-मुली शिक्षणाने आपले भवितव्य घडवत असल्याचे त्यांनी सांगितले.

मिराताई बारस्कर यांनी शिक्षणाने सर्वसामान्य घटकातील मुलांच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीकोनाने व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता यशवंती मराठा महिला मंडळाच्या सदस्यांनी हा उपक्रम राबविण्यात आला. सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *