विद्यार्थ्यांना आधार व प्रोत्साहन देण्याचा दळवी यांचा सातत्याने उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व गुणवंतांना बक्षीस स्वरुपाने सातत्याने प्रोत्साहन देणारे जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त तालुका विकास अधिकारी बाबूराव दळवी यांनी कर्मवीर आबासाहेब निंबाळकर न्यू इंग्लिश स्कूल मलठण (ता. कर्जत) मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गांगर्डे, सरपंच शालिनी खोसे, ह.भ.प. परमेश्वर भिसे महाराज, माजी सभापती आप्पासाहेब भिसे, ग्रामसेवक केसकर, डॉ. सुरेश भिसे, भिवा भिसे, पोलीस पाटील विजय भिसे, किरण दळवी, सज्जन पठाण, डॉ. मुबारक शेख, शहेनाज शेख, गुलाब भिसे, सहशिक्षक विठ्ठल कुसकुरे, संभाजी काळंगे, जालिंदर सूर्यवंशी, बापूराव वायाळ, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्वाती जाधव, संजय गोरे, नारायण वाघमारे, संतोष खांदवे, मंगल अनभुले, किसन आटोळे, केंदळे, भिसे, खेडकर, पेटकर, काळदाते आदींसह शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुधाकर गांगर्डे म्हणाले की, माणुस आपल्या विचाराने कर्तुत्वाने ओळखला जातो. अनेक वर्षापासून गावाबाहेर राहूनही गावाविषयी तळमळ ठेऊन दळवी परिवार विद्यार्थ्यांना आधार व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. मातीशी नाळ घट्ट ठेऊन त्यांचे कार्य सुरु आहे. गेल्या दहा वर्षापासून चौथी ते दहावी पर्यंत प्रथम क्रमांक आलेल्या मुलांना रोख बक्षीस ते देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबूराव दळवी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व दिशा देण्यासाठी कार्य सुरु आहे. आजचे विद्यार्थी उद्याच्या सक्षम भारताचे भविष्य असल्याचे सांगितले. शाळेच्या वतीने दळवी परिवाराचे आभार मानण्यात आले.