• Mon. Jul 21st, 2025

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ByMirror

Dec 4, 2023

दिव्यांगांना गरजेच्या संसाधन वस्तूची मदत; जागतिक दिव्यांग दिनाचा सामाजिक उपक्रम

दिव्यांगांना प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस मुकबधीर-दिव्यांग बाधवांसह साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी युवकच्या वतीने भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच काही दिव्यांगांना घरी जाऊन गरजेच्या संसाधन वस्तू देण्यात आल्या.


दिव्यांग दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी सामाजिक उपक्रम राबविला. यावेळी किरण घुले, केतन ढवण, मंगेश शिंदे, ओंकार मिसाळ, गौरव हरबा, कृष्णा शेळके, ऋषीकेश जगताप, तणवीर मणियार, रोहितसिंग सरना, शिवम कराळे, दीपक गोरे, आशुतोष पानमळकर, ओंकार म्हसे, शुभम चितळकर आदी उपस्थित होते.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, दिव्यांग बांधवांना अद्यावत शिक्षणाच्या उपलब्ध करुन त्यांना प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. दिव्यांग बांधव हा समाजातील एक घटक असून, त्यांना वेगळ्या नजरेने न बघता त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. युवकांनी मी व माझे कुटुंबापलीकडे जावून समाज भावनेने योगदान दिल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर समाजातील घटक असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत असून, त्यांना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *