मुकबधीर व जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे व नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी शहरा जवळील मातोश्री वृद्धाश्रम मधील ज्येष्ठांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करुन पाथर्डी तालुक्यातील कारेगाव निवासी मुकबधीर विदयालय व मोहटादेवी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शिलाताई शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्राला सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने मिळाला आहे. गोर-गरीबांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाने शेतकरी, गोरगरिब जनता सुखावली असून, त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्विनीताई जाधव म्हणाल्या की, हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रभक्तीचा वैचारिक वारसा एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे. सर्व नागरिकांच्या कल्याणाचा विचार केला जात असल्याचे, त्या म्हणाल्या. तर नगर शहरात सर्वसामान्य महिलेला शिवसेनेचा महापौर करताना त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. तर शहर विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहटादेवीचे आशिर्वाद घेऊन मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून महाराष्ट्राचा विकास होवो आणि ते परत मुख्यमंत्री व्हावे, अशी आई मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमख ओंकार शिंदे, तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे, माजी सरपंच सिमा पालवे, वंदना ढाकणे, संदीप पालवे, अर्जुन धायतडक, शेकटा गावचे सरपंच माऊली घुले, सचिन खाडे, संदीप खेडकर, सुरेश फुलचुते, भागवत चिमटे, म्हातारदेव डांगे, नारायण शेकडे, सुरेश फुले, संदीप जूते, महादेव पालवे, भैय्या दहिफळे, माजी सरपंच महादेव दहिफळे, सतीश पालवे, दत्तात्री खेडकर उपस्थित होते.