जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत मिळवले स्थान
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा क्लास केडगाव शाळेचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी ध्रुव किरण जगताप याने 218 गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर देवयानी दिनेश येणे, यश महेश गाडे व किरण चंद्रकांत पारधे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.

या गुणवंत विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका किशोरी भोर, राजेंद्र वाबळे, कानिफनाथ गुंजाळ, अनिलकुमार ढवळे, उपाध्यापक सिमा खाजेकर, सुषमा तरडे, राजेंद्र वाघमारे, बबन कुलट यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक किसन दुधाडे यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेत पेढे भरवून सत्कार करण्यात आला.
नगर पंचायत समिती यांनी वर्षभर सुरू ठेवलेले ऑनलाइन क्लास आणि शाळेत प्रश्नपत्रिकांचा सरावामुळे विद्यार्थ्यांना यश मिळवता आल्याची भावना वर्ग शिक्षिका किशोरी भोर यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, केडगाव बीटच्या विस्ताराधिकारी निर्मला साठे, विषय तज्ञ प्रियवंदा कुलकर्णी, केडगावचे केंद्र प्रमुख बाळासाहेब दळवी यांनी अभिनंदन केले.