अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव शाहूनगर येथील 19 वर्षीय युवक देवा सागर जेदिया याचे चास शिवारात अपघाती निधन झाले. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
तो निमगाव वाघा रोडवर असलेल्या सौ. सुंदरबाई माणिकराव अडसुळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण व चुलते-चुलती असा परिवार आहे. पुणे डेक्कन येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे त्याचे अवयवदान करण्यात आले.