• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

पोतराज व मरीआईचा अवमान करणाऱ्यावर कारवाईची मागणी

ByMirror

Aug 14, 2025
पोतराज वाजंत्री संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

पोतराज वाजंत्री संघटनेचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन


वादग्रस्त वक्तव्याने मातंग समाजाची अस्मिता धोक्यात; महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाची अस्मिता असणारे पोतराज व मरीआईचे नाव घेऊन टीका करणाऱ्या समाजकंटकावर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शहरातील पोतराजांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांना निवेदन दिले. यावेळी विकास उडानशिवे, लखन लोखंडे, विशाल वैरागर, योगेश साळवे, विश्‍वास उमाप, इंद्रभान खुडे, गणेश गायकवाड, कार्तिक गायकवाड, संजय चांदणे, मयूर उडाणशिवे, सोनू चांदणे, ओमकार उमाप, भाऊ पेटारे, गंगा गाडे आदी उपस्थित होते.


काही दिवसांपूर्वी नवनाथ वाघमारे याने मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करताना पोतराज व मरीआईचे नाव घेऊन टीका केली. वाघमारे सातत्याने चूकीचे वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. अशा प्रवृत्तीमुळे समाजामध्ये भांडण, कलह निर्माण होत आहे. या लोकांना वेळीच आवर घातल्यास पुढील अनर्थ टाळता येऊ शकणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


पोतराज हे त्यागाचे प्रतीक असल्याचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये याचा पुरावा आढळतो. आयुष्यभर डोक्याचे केस न कापता, देव-देवींची आराधना तो करत असतो. समस्त मातंग समाजाचा अपमान करण्याचे हेतूने वाघमारे यांनी वक्तव्य करुन पोस्ट प्रसारित केलेली आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोतराज वाजंत्री संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *