पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांना मातृशोक
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रयागाबाई शामसुंदर त्रिमुखे यांचे गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 80 वर्षांच्या होत्या. निवृत्त सहायक फौजदार शामसुंदर त्रिमुखे यांच्या त्या पत्नी, तर जेष्ठ पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांच्या त्या आई होत.
काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्या रुग्णशैय्येवर होत्या. गुरुवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शहरातील नालेगाव अमरधाम येथे करण्यात आला.
यावेळी नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, निखिल वारे, नितीन बारस्कर, वीरशैव कक्कय्या समाजाचे सुभाष त्रिमुखे, रमेश त्रिमुखे, गोविंद कवडे, पत्रकार विठ्ठल लांडगे आदींसह मोठ्या संख्येने नातेवाईक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.