श्रीरामपूर येथे झाला गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्तात्रय सुरेश घोडके यांना विद्याराज फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र गौरव क्रीडारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथील गोविंदराव आदिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डॉ. निहाल कांबळे आणि सुनील ईश्वर पाटील यांच्या हस्ते घोडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दत्तात्रय घोडके किन्ही (ता. पारनेर) येथील उत्कृष्ट क्रिकेटपटू असून, ते क्रिकेट खेळासाठी योगदान देत आहेत. त्यांच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोफ्लगरे, माजी रणजी क्रिकेटपटू शिवाजी खोडदे, क्रिकेटपटू सुदाम खोडदे तसेच सर्व किन्ही, बहिरोबावाडी येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
