भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे करणार प्रतिनिधित्व
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जलतरणपटू अम्रितसिंग दीपक राजपूत याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नुकतेच डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जलतरणपटू अम्रितसिंग राजपूत याने 50 मीटर बटरफ्लाय या क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.

6 ऑगस्ट पासून भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी राजपूत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा असून, त्याला जिल्हा संघाचे मार्गदर्शक सर्वेश देशमुख, अहमदनगर जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव रावसाहेब बाबर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, विश्वजीत चव्हाण, कराळे जलतरण तलावाचे करण कराळे, उदय कराळे, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी त्याचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजपूत हा सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलचा इयत्ता नऊवीचा विद्यार्थी आहे.