पंढरपूर मध्ये झाला अंदानी यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात ईगल न्यूज नेटवर्कच्या वतीने अंदानी यांना मा.आ.रामहरी रुपनवर यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपायुक्त (पणन) सुभाष घुले, प्रा.डॉ. कैलास करांडे, किशोर भंडारी, प्रवीण काकडे, प्रा. महादेव तळेकर, लुनेश वीरकर, प्रा.डॉ.महेश मोटे, विलासराव कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सीए अंदानी अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींना सामाजिक भावनेने मार्गदर्शन आणि सहकार्य करत असतात. अंदानी यांचे नुकतेच भारतीय पोस्टाने 5 रुपयांचे पोस्ट स्टॅम्प प्रसारित केले आहे. युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान झाला आहे. जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करुन त्यांनी आंतरराष्ट्रीय अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार, मानद डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मागील 15 वर्षापासून ते श्री साई बाबा संस्थानाचे कर सल्लागार, तर 17 वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेचे आयकर सल्लागार आहेत. 521 सामाजिक संस्था मंदिराचे ते विनामूल्य आयकर सल्लागार म्हणून काम पाहत आहे. तर 65 गौशालाचे सल्लागार, 511 किसान उत्पादक कंपनीचे सल्लागार असून, अंतरराष्ट्रीय संघाचे ते महामंत्री आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.